
केंद्र सरकारच्या ‘स्वदेश दर्शन’ या योजनेखाली गोव्यातील काही पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारकडून ९९ कोटी ९८ लाख रुपयांचा खास निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती गोव्याचे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी दिली.
पणजी- केंद्र सरकारच्या ‘स्वदेश दर्शन’ या योजनेखाली गोव्यातील काही पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारकडून ९९ कोटी ९८ लाख रुपयांचा खास निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती गोव्याचे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी दिली.
या निधीतून समुद्रकिना-यावर ३९ ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे, चेंजिंग रुम्स, पर्यटक माहिती केंद्रे, सीसीटीव्ही कॅमेरे, व्हायफाय सेवा, पर्यटन माहिती फलक, पार्किंग सुविधा, विद्युतीकरण करण्यात येणार असल्याचेही परुळेकर म्हणाले.
पर्यटन खात्याचे सल्लागार दाराशाँ अॅण्ड कंपनीने तयार केलेले प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठवले होते, ते मंजूर करण्यात आल्याचे परुळेकर यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात उत्तर गोव्याचे काही प्रस्ताव पाठवण्यात आले होते.
कळंगुट, बागा, वाघातोर, मांद्रे, आश्वे समुद्र किनारपट्टीचा विकास आणि तेथील साधनसुविधांच्या निर्मितीचे प्रस्ताव पाठवले होते. ते मान्य करण्यात आले आहेत. त्यासाठी ९९ कोटी ९८ लाख रुपये केंद्राने मंजूर केल्याचे परुळेकर यांनी सांगितले.
दुस-या टप्प्यात दक्षिण गोव्यातील पर्यटन विकासाचे प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. सुमारे दोनशे कोटी रुपयांचे प्रस्ताव त्यात असतील. नदी आणि अध्यात्म सíकट, वारसास्थळांचा विकास, आदिवासी स्थळाचा पर्यटनदृष्टय़ा विकास, किल्ल्यांचे संवर्धन, ऐतिहासिक वास्तूंचे जतन यासारख्या गोष्टींचा त्यात समावेश असेल, असेही परुळेकर यांनी या वेळी सांगितले.