
ज्येष्ठ नेते व माजी खासदार अंकुशराव टोपे (७४) यांचे रविवारी पहाटे चेन्नई येथे निधन झाले.
जालना- ज्येष्ठ नेते व माजी खासदार अंकुशराव टोपे (७४) यांचे रविवारी पहाटे चेन्नई येथे निधन झाले. सोमवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी शारदाबाई, पुत्र माजी मंत्री राजेश टोपे, मुलगी वर्षा, नातवंडे असा परिवार आहे. अंकुशराव टोपे यांचे पार्थिव एअर अॅम्ब्युलन्सने रविवारी दुपारी औरंगाबाद येथे आणण्यात आले.
रविवारी सायंकाळी जालना आणि सोमवारी सकाळी त्यांचे पार्थिव अंबड येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यावर अंकुशनगर येथील समर्थ सहकारी साखर कारखाना येथे सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार केले जातील.