Quantcast
Channel: महाराष्ट्र – Prahaar.in
Viewing all articles
Browse latest Browse all 17269

कात्रजमध्ये वाहने जाळल्याप्रकरणी एकजण अटकेत

$
0
0
pune jalitkand

कात्रजमध्ये मंगळवारी पहाटे गणेश पार्क सोसायटीच्या पार्किंगमध्ये वाहनांना आग लावण्याप्रकरणी एक जणाला पोलिसांनी अटक केली आहे. 

pune jalitkandपुणे- कात्रजमध्ये मंगळवारी पहाटे गणेश पार्क सोसायटीच्या पार्किंगमध्ये वाहनांना आग लावण्याप्रकरणी एक जणाला पोलिसांनी अटक केली आहे. गुरूवारी सकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

प्रणय दिलीप धाडवे (२९) असे या तरुणाचे नाव आहे. भारती विद्यापीठच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

रंगपंचमीच्यादिवशी पार्किंगमधील मोटारीला रंग लावल्याच्या रागातून ही जाळपोळ केल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रणय धाडवे आणि त्याचा मामा गणेश पार्क सोसायटीत राहतात. प्रणयच्या मोटारीला रंगपंचमीदिवशी मामाचा मुलगा सुरेश बाठे याने रंग लावल्याने प्रणयला त्याचा राग होता.त्यामुळे त्याने मंगळवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास बाठे याच्या दुचाकीला आग लावून पळ काढला. त्यामुळे इतर गाड्यांनाही आग लागली. मात्र, प्रणय हा सुरक्षा रक्षकाला दिसला होता.

सोसायटीच्या पार्किंगमधील वाहनांना लावलेल्या आगीत तेरा दुचाकी व तीन चारचाकी वाहने जळून खाक झाली होती. इमारतीतून बाहेर पडणारे दोघे जण किरकोळ जखमी झाले होते.

पुण्यात जळीतकांडाचे सत्र सुरूच

pune jalitkand

पुण्यात जळीतकांडाचे सत्र अजूनही सुरूच आहे. सोमवारी मध्यरात्री कात्रज येथे तीन चारचाकी आणि १५ दुचाकी वाहनांला मोठ्या प्रमाणात आग लागली.


Viewing all articles
Browse latest Browse all 17269

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>