
नागपूर ही संघाची भूमी नसून, दिक्षाभूमी असल्याचे वक्तव्य जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार याने केले आहे.
नागपूर- नागपूर ही संघाची भूमी नसून, दिक्षाभूमी असल्याचे वक्तव्य जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार याने केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त कन्हैया गुरूवारी नागपूरमध्ये आला होता. त्याने दिक्षाभूमीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यानंतर तो विद्यार्थी संघटनांच्या कार्यक्रमात सहभागी झाला. त्यावेळी त्याने भाषण केले.
भारत हा लोकशाही देश आहे, हा देश मनुस्मृतीनुसार चालणार नाही. संघ नागपूरला बदनाम करत आहे. मात्र नागपूरची भूमी ही संघाची नसून, ही बुद्धांची, बाबासाहेबांची दीक्षा भूमी आहे, असे यावेळी कन्हैया म्हणाला.
सकाळी कन्हैया नागपूर विमानतळावर दिक्षाभूमीकडे जाण्यासाठी निघाला असतांना त्याच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली.
कन्हैयाला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला असून त्यांनी त्याच्या गाडीवर दगडफेक केल्याचे समजते. यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले. मात्र, कन्हैया सुखरूप आहे.