
जामखेड येथील सराफ दुकानात कामाला असलेल्या अजहर शेख (१८) या बंगाली कारागिराने घरातच अंगावर रॉकेल ओतून पेटवून आत्महत्या केली.
जामखेड- जामखेड येथील सराफ दुकानात कामाला असलेल्या अजहर शेख (१८) या बंगाली कारागिराने घरातच अंगावर रॉकेल ओतून पेटवून आत्महत्या केली. जामखेडचा सराफा बाजार परिसरात प्रसिद्ध आहे.
पश्चिम बंगालमधील जवळपास ८० कारागिर येथे कामाला आहेत. सराफांच्या बंदमुळे हे सर्व कारागिर सध्या बेकार आहेत. अजहर शेखही बेकार होता. सराफांचा बंद सुरू झाल्यानंतर शेख हा महिन्यापूर्वी आपल्या गावी निघून गेला होता;
परंतु तेथेही काम न मिळाल्याने शुक्रवारी तो परत जामखेड येथे आला होता. सव्वा महिन्यानंतरही सराफा बाजार बंद असल्याने त्याला नैराश्य आले होते. त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे.